मंदिर हितासाठी संघटित चळवळ
"चला, मंदिरहितासाठी एकत्र येऊया! मंदिरांचे संरक्षण ही केवळ विश्वस्तांची जबाबदारी नाही; ती आपल्या संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे."
महाराष्ट्र देवस्थान समिती ही मंदिरांचे संरक्षण, संवर्धन, देवस्थानांच्या मालमत्ता व जमिनींचे हक्क, मंदिर प्रशासनातील अडचणी आणि मंदिर विश्वस्तांच्या विविध प्रश्नांसाठी संघटनात्मक पातळीवर कार्य करणारी चळवळ आहे.
राज्यातील विविध मंदिर संस्था, देवस्थान समित्या, विश्वस्त, पुजारी, सेवेकरी आणि मंदिरप्रेमी यांना एका व्यापक व्यासपीठावर आणून मंदिरहितासाठी सामूहिक आवाज निर्माण करणे, हा समितीचा प्रमुख प्रयत्न आहे.
समितीचे मूळ माहितीपत्रक
सहा दिशांनी सुरू असलेले कार्य
मंदिर संस्कृतीचे रक्षण व संवर्धन
प्राचीन मंदिरांची परंपरा, धार्मिक वारसा, संस्कृती आणि श्रद्धास्थानांचे जतन करणे.
देवस्थान जमिनींचे संरक्षण
देवस्थान इनाम जमिनी, मंदिरांच्या मालकीच्या जमिनी, महसूल अभिलेख आणि हक्कांचे संरक्षण करणे.
मंदिरांच्या कायदेशीर प्रश्नांवर मार्गदर्शन
जमीन, अतिक्रमण, महसूल नोंदी, कुळ-कायदा, सीलिंग, हस्तांतरण आणि इतर प्रशासकीय प्रश्नांबाबत मार्गदर्शन.
मंदिर विश्वस्तांचे संघटन
तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर मंदिर विश्वस्तांना एकत्र आणून त्यांच्या प्रश्नांना संघटित स्वरूप देऊन त्यांचा सामूहिक लढा उभारणे.
शासनाशी समन्वय
जिल्हाधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, धर्मादाय आयुक्त कार्यालय आणि शासन स्तरावर निवेदन व पाठपुरावा.
मंदिरांचे डिजिटल सक्षमीकरण
मंदिरांची माहिती संकलित करून डिजिटल डेटाबेस व अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून मंदिरांना व्यापक व्यासपीठ मिळवून देणे.
शासनाकडे सादर करण्यात आलेल्या मागण्या
देवस्थान इनाम जमीन संरक्षणाचा लढा — २०२६ मध्ये देवस्थान इनाम जमिनींसंबंधित प्रस्तावित कायद्याबाबत राज्यभर हरकती व निवेदने सादर केली. ६ जून २०२६ रोजी शासनाने सदर प्रारूप कायद्याची सुधारित प्रक्रिया उभयपक्षी सक्षम समिती स्थापन करण्याची घोषणा केली. या प्रक्रियेत विविध देवस्थानांच्या प्रतिनिधींची तरतूद करण्यासाठी समितीने पाठपुरावा सुरू ठेवला आहे.
तालुका-तालुक्यात होत असलेले संघटन
पुढील बैठका, कार्यक्रम व नियोजन
समितीच्या आगामी बैठका, परिषदा व कार्यक्रमांचे वार, वेळ व दिनांकासह नियोजन येथे प्रसिद्ध केले जाते. या उपक्रमांमध्ये आपली उपस्थिती नोंदवा.
प्रत्येक मंदिराची माहिती — एका डिजिटल व्यासपीठावर!
मंदिरांची माहिती संकलित करून पुढील गोष्टी डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिल्या जातील.
मंदिरांचे नाव व इतिहास
विश्वस्त मंडळाची माहिती
धार्मिक उत्सव व कार्यक्रम
जमीन व मालमत्ता माहिती
पत्ता व संपर्क
छायाचित्रे
महत्त्वाचे दस्तऐवज
भाविकांसाठी सुविधा
विश्वस्त परिषदेकडे वाटचाल — अमरावती येथील मंदिर विश्वस्त परिषद आयोजित करून बिखुरलेल्या महाराष्ट्रातील मंदिर विश्वस्तांना एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मंदिरांचे प्रश्न एकत्रित करणे
राज्यभरातील मंदिरांचे प्रश्न एका ठिकाणी नोंदवून पाठपुरावा करणे.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन
कायदेशीर व प्रशासकीय बाबींवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन उपलब्ध करून देणे.
शासनासमवेत सामूहिक भूमिका
मंदिर संघटनांची एकत्रित भूमिका शासनासमोर मांडणे.
संघटनात्मक व प्रशासकीय बळकटीकरण
जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय मंदिर संघटन अधिक सक्षम करणे.
मंदिर व देवस्थान माहिती संग्रह
राज्यातील मंदिरांची संपूर्ण माहिती — इतिहास, विश्वस्त मंडळ, उत्सव, पत्ता व सुविधा — या ठिकाणी टप्प्याटप्प्याने जोडली जात आहे.
आपल्या शोधाशी जुळणारी कोणतीही नोंद सापडली नाही.
छायाचित्र व चित्रफीत दालन
समितीच्या बैठका, परिषदा, आंदोलने व कार्यक्रमांची छायाचित्रे आणि व्हिडिओ येथे पाहा.
आपल्या परिसरातील मंदिराची माहिती सुचवा
खालील फॉर्म भरा — समितीच्या पडताळणी व मंजुरीनंतर ही माहिती "मंदिरांचा इतिहास" विभागात सर्वांसाठी प्रकाशित केली जाईल.
प्रसारमाध्यमांतील वृत्त
राज्यभरातील विविध वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या समितीच्या कार्याच्या बातम्या.
मंदिरहितासाठी आपले योगदान द्या
मंदिर संस्कृतीचे रक्षण, देवस्थान जमिनींचे संरक्षण आणि मंदिर विश्वस्तांच्या संघटनासाठी सुरू असलेल्या या व्यापक अभियानाला आपल्या देणगीरूपी सहकार्याची आवश्यकता आहे.
आपली देणगी कशासाठी वापरली जाते?
- 🛕 मंदिर संस्कृतीचे रक्षण व संवर्धन कार्य
- 📜 देवस्थान जमिनींच्या संरक्षणासाठी कायदेशीर पाठपुरावा
- 🤝 तालुका व जिल्हास्तरीय मंदिर विश्वस्त बैठका व संघटन
- 💻 मंदिरांच्या डिजिटल सक्षमीकरणासाठी संकेतस्थळ व डेटाबेस
देणगी तपशील
(बँक व UPI तपशील समितीकडून लवकरच अद्ययावत केला जाईल. तोपर्यंत कृपया खालील नोंदणी फॉर्म भरा — समितीचे प्रतिनिधी आपल्याशी संपर्क साधतील.)
- खातेधारकाचे नाव: [ बँक तपशील येथे टाका ]
- बँक व शाखा: [ बँक तपशील येथे टाका ]
- खाते क्रमांक: [ बँक तपशील येथे टाका ]
- IFSC कोड: [ बँक तपशील येथे टाका ]
- UPI आयडी: [ UPI आयडी येथे टाका ]
थेट संपर्कासाठी: +91 9423 425830 / +91 8600 002513
देणगीसाठी नोंदणी करा
आपली मंदिरविषयक तक्रार किंवा समस्या नोंदवा
आपल्या मंदिराशी, देवस्थान जमिनीशी अथवा विश्वस्त मंडळाशी संबंधित कोणतीही अडचण खालील फॉर्मद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवा. इच्छा असल्यास आपले नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाईल.
आपणही या मंदिरहिताच्या व्यापक अभियानात सहभागी व्हा
एकत्र येऊया… संघटित होऊया… मंदिरहितासाठी लढूया!
प्रदेश कार्यालय
- 📍 महाराष्ट्र देवस्थान समिती, परांजपे कॉलनी, अँटी करप्शन ब्युरो कार्यालयासमोर, अमरावती
- 📞 +91 9423 425830
- 📞 +91 8600 002513
- 📞 +91 7498 332977
- 📞 +91 9823 132150
- 📞 +91 9422 915564
आमची कार्यपद्धती
समस्येपासून समाधानापर्यंतचा प्रवास —
समस्येसाठी पाठपुरावा करून समाधान मिळवणे, हेच आमचे ध्येय.